आकार

आकार :

शब्‍दाला आकार  नसतो. परंतू कवी मात्र मनातील कल्‍पनांचा वापर करुन कवितेला आकार देतो. सूर किंवा आवाज याला आकार नसतो. मात्र गायक संगीतांच्‍या लहरीतून भावना प्रगट करतात. त्‍याच प्रमाणे चित्रकार आपल्‍या कल्‍पनेला रेषेच्‍या व रंगांच्‍या साहाय्याने आकार देतात.
या आकारांना विशिष्‍ट स्‍थान प्राप्‍त झाले व विषयास अनुसरुन मांडणी केली की आकारांचे अर्थ कळू लागतात. या अर्थाला रंगाची मदत होते. त्‍यामुळे आपले लक्ष आकार व रंग यावर केंद्रीत होते आणि यातून भावनेचा अर्थ प्रकट होतो.
चित्रातील एखाद्या क्षेत्राची व्‍याप्‍ती म्‍हणजे आकार’. आकार लांबी, रुदी, जाडी, आणि दिशा यांच्‍या सहाय्याने कळतो. आपण रेषेच्‍या सहाय्याने आकार काढू शकतो. रेषांनी त्‍याची मर्यादा दाखवता येते किंवा रंगाने भरीव आकार काढल्‍यास त्‍या भरीव आकारास रेषेची मर्यादा नसते. पण त्‍यातील भरीवपणामुळे पाश्‍वभूमीपासून तो स्‍वतंत्र दिसतो व त्‍याचा किनारा ही त्‍याची मर्यादा असते.
हे आकार एकमेकांना आच्‍छादीत असतील तर हा भास अधिकच प्रभावाने जाणवतो आकाराने चित्राला घनता प्राप्‍त होते.
आकारमानाच्‍या बदलाने आकार जवळचा की लांबचा याची जाणिव होते. तसे हे अंतर कोणत्‍या वस्‍तूचे आकार आहेत यावर अवलंबून असते. तर दोन आंबे एक लहान व एक मोठा काढला तर त्‍यांचे हे अंतर काही सेंटीमिटर असेल पण हे आकार दोन ता-यांचे असतील तर हे अंतर किलोमिटर मध्‍ये असते. तसेच गडद व किक्‍या रंगातून सुध्‍दा आकारातील अंतर दाखवता येते.

आकाराचे प्रकार 
   
१.    नैसर्गिक आकार : निसर्गनिर्मित विविध घटकांचे वस्‍तुंचे चित्रण यामध्‍ये येते. उदा. झाड, फुले, डोंगर, नदी, प्राणी, पक्षी इ.
२. भौमितिक आकार : मानवनिर्मित वस्‍तूंचे चित्रण या मध्‍ये येते. उदा. घरे, टेबल, भांडी, कपाट, धातूपासून तयार केलेल्‍या वस्‍तू इत्‍यादी.
३.   अलंकारीक आकार : नैसर्गिक आकार व भौमितिक आकारांना कल्‍पनेची जोड देऊन गतीमान रेषांतून केलेले रेखाटन याला अलंकारिक आकार असे म्‍हणतात.
४. व्‍यंगात्‍मक आकार (कार्टुन) : नैसर्गिक व भौमितिक आकारांचे स्‍वकल्‍पनेने मनोरंजनासाठी व्‍यंगात्‍माक (कार्टुन) रेखाटन करणे. या मध्‍ये प्रामुख्‍याने लहान मुलांना आकर्षित करण्‍याची तकत असेत.


५.  अमृत आकार : ज्‍या आकरातून कोणताही अर्थबोध होत नाही असा आकार. उदा. रंगाचे ठिंब टाकून त्‍यावर फुंकर मारुन त्‍यातून तयार होणारे आकार, दोरा रंगात बुडवून तयार होणारे आकार इत्‍यादी. 

No comments

माझी गच्चीवरील शेती

  माझी गच्चीवरील शेती      आज प्रत्येक मानुस भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याच प्रमाणे शासनही लोकांनां या सुविधा द...