चित्रकलेचे घटक

चित्र -
रेखाटन (कलेची मूलत्‍त्‍वे) रेषा, आकार, रंग, पोत.

विशिष्‍ट उद्दिष्‍टे :
·       रेषा व रंगाचे प्रकार, संबोध, आशय समजून घेण्‍यास मदत करणे.
·       विविध रेषांनी होणारे आकार व त्‍यांची वैशिष्‍टये जाणून घेण्‍यास मदत करणे.
·       विविध मध्‍यमे साहाय्यभूत कलासाधने साहित्‍य आणि तंत्राचा कौशल्‍य पूर्ण वापर करण्‍यास चालना देणे.
कला आणि मानवीजीवन यांचा संबंध आदिम काळापासून आधुनिक युगापर्यंत आहे. आणि तो पुढेही राहील. मानवी जीवनाशी कला इतकी निडगीत आहे की, तिचे वेगळे अस्तिव राहू शकत नाही. आपण अनेक गोष्‍टी, कवीता वाचतो. काही वेळा आपण चित्रपट पाहतो, चित्र पहातो. व्‍याख्‍याने ऐकतो त्‍यातील सर्वच आपणास आवडते असे नाही. परंतू जे आवडते त्‍यात आपण रंगून जातो. आपले मन त्‍यात रममाणा होते. आपली प्रसन्‍न्‍ता त्‍यामुळे वाढते.
सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात आपण पहातो, प्रत्‍येकजण  प्रवासात, काही कामकरीत असताना कानामध्‍ये हेडफोन घालून गाण्‍याचा अस्‍वाद घेत असतो. गायकाच्‍या गोड व सुरेल गायकीने आपल्‍या मनावर विशिष्‍ट परिणाम होतो. त्‍या गाण्‍यातील शब्‍द, त्‍या शब्‍दातील कृती, त्‍या कृतीचे आकलनाचे दृष्‍य स्‍वरूप त्‍यावेळी आपल्‍या मन: चक्षू पुढे येते आणि जणू काय आपणच ज्‍या गीताबरोबर चालायला लागतो ही भावना व परिस्थिती आपली अशी का होते? तर गायकाने म्‍हटलेले गाण, त्‍या गाण्‍यतील शब्‍दांच्‍या चढउतारांत, आवाजाची लय साधलेली असते. शब्‍द व भावना यांचा मेळ आवाजाच्‍या लयीबरोबर निर्माण केलेला असतो. म्‍हणून तो कानाला गोड लागतो, मधूर लागतो. याचे कारण गायकाने त्‍या गाण्‍याची केलेली उत्‍कृष्‍ट उकल्‍च कारणीभूत असते. म्‍हणून त्‍या गाण्‍याचा योग्‍य जो परिणाम व उकल समजणे हाच खरा रसास्‍वाद होय. त्‍यावेळी आपण म्‍हणतो, खरोखर हे गाणे छान आहे मी अगदी रंगुन गेलो होतो. हा परिणाम असाच प्रत्‍येक कलाकृतीच्‍या बाबतीत झाला की ती चांगली आहे का वाईट आहे हे ठरविण्‍याची पात्रता आपल्‍या अंगी येते.
एखादे चित्र ज्‍यावेळी आपण चांगले म्‍हणतो त्‍यावेळी त्‍यातील रेषा, आकार, रंग, पोत आणि चित्राचे विषयानुरूप वातावरण याचाच विचार त्‍यात अप्रत्‍यक्षपणे होत असतो. आणि त्‍या चित्रातील मार्ग आपणास कळू लागतो म्‍हणून या रेषा, आकार, रंग व पोत यांची माहिती आपणास असणे आवश्‍यक आहे.

रेषा :  अनेक टिंबा मिळून रेषा तयार होते. आणि रेषा आकार दाखविते, म्‍हणजे दिशा, खोली व लांबी दाखविते. चित्रात रेषेला खुप महत्‍व आहे. किंबहूना रेषेशिवाय म्‍हणजेच आकाराशिवाय चित्रच तयार होऊ शकत नाही.

रेषेला सौंदर्य असते. तिला भावना असतात. ती ज्‍या पद्धतीने काढली जाते त्‍या प्रमाणे तिचा अविष्‍कार होते असतो. हा अविष्‍कार भावना व सौंदर्य यांचा संबंध दाखवितो. ही रेषा ज्‍यावेळी आकार दाखविते त्‍याचवेळी ती विषय प्रतिपादन करते. 

रेषेचे अनेक प्रकार आहेत.
१. उभी रेषा    २. आडवी ( क्षितीज रेषा)    ३. तिरकी रेषा     ४. लयदार रेषा (वर्तुळाकृती)     ५. गुंताळी रेषा हे प्रमुख प्रकार आहेत. यामध्‍ये बारीक रेषा, जाड रेषा, तुटक रेषा, छेद रेषा असे उपप्रकार पडतात. या रेषांना भावना आहेत. त्‍या प्रतिकात्‍मक आहेत.
१.    उभी रेषा :  एखादा मानुष्‍य ताठ उभा राहिला. हलत नाही, बोलत नाही. ते आपण म्‍हणतो का रूबाबात आहे तो. अगदी स्थिर, निश्‍चल वृत्‍ती व शांतपणे उभा आहे अगर बसलेला आहे हिला लंब रेषाही म्‍हणतात. म्‍हणजे
उभी रेषा – स्थिरता, निश्‍चलता, शांतता व रुबाब दाखविते.
उदा. बादशापुढे न झुकणारे शिवाजी महाराज, विजेचे खांब, मोठी झाडे इत्‍यादी.
२.   आडवी रेषा (क्षितीज रेषा) :   जमिनीशी समांतर असा झोपलेला माणूस हा विश्रांती घेत आहे. शांत आहे.
आडवी रेषा (क्षितीज रेषा) - विश्रांती, शांतता, निर्जीवता, निश्चिलता,  दाखवते,
उदा. झोपलेला माणूस, निरजंन माळावरील रस्‍ता, सपाट समुद्र किणारा, वाळवट इत्‍यादी.
३.   तिरकस रेषा :  मनुष्‍याची हालचाल, गती आगर एखादी कृति या रेषांनी दाखवितात. जर मानुस जिवंत असला तर हालचाल करतो. करण त्‍यात चैतन्‍य असते.
तिरकस रेषा  हालचाल, गती, जिवंतपणा, चैतन्‍य, कृति व अस्थिरता दाखवते.
उदा. धावणारी मुले, जोरात पडणारा पाऊस, घराचे उतरते छपर, डोंगराचा उतार इत्‍यादी
४.  लयदार रेषा : मुले आपला आनंद व्‍यक्‍त करताना नाचू लागतात त्‍यामध्‍ये लय असते. म्‍हणजे या
लयदार रेषा - तारुण्‍य, आनंद व उल्‍हासित वृत्‍ती, खेळकरपणा, नाजुकता व लवचिकपणा म्‍हणजे लय दाखवतात.
उदा.  गाण्‍याचे सुर, नर्तकीचे हावभाव, सपाचे सरपटणे, घाटतील रस्‍ता इत्‍यादी.
५.  गुताळी रेषा :  अनेक वेळा मानसाच्‍या मनात बेरेच विचार व त्‍यांचे काहुर मनाते चालते. कोणत्‍याच गोष्‍टीचे उत्‍तर सापडत नाही असा गोंधळ होतो. तो गोंधळा दाखवण्‍यासाठी या रेषांचा वापर करतात.
उदा. दो-याचा गुंता, केसाचा गुंत.
असे रेषा व त्‍यांचे मानची भावनांशी संबंध जोडता येतील. चित्रकार चित्रातील विषयाला अनुरूप असा भावाविष्‍कार रेषांच्‍या द्वारे आपल्‍या चित्रात घडवीत असतो.
असे रेषा व त्‍यांचे मानवी भावनांशी संबंधजोडता येतील. चित्रकार चित्रातील विषयाला अनुरुप असा भावाविष्‍कार रेषांच्‍या द्वारे आपल्‍या चित्रात घडवीत असतो.

रेषा जाड, बारीक, तुटक काढुन ठसठशीतपणा अगर नाजुक पणा चित्रात आणता येतो. त्‍याच प्रमाणे रेषांच्‍या फटाकारेबाजीने चित्रात जोमदारपणा येतो तर तुटक रेषेतून मनाचा चंचल पणा दाखवता येतो.

No comments

माझी गच्चीवरील शेती

  माझी गच्चीवरील शेती      आज प्रत्येक मानुस भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याच प्रमाणे शासनही लोकांनां या सुविधा द...