कलेचे महत्‍व

कला म्‍हणजे काय ?
          कला मधील कल हा मुळ संस्‍कृत शब्‍द आहे. कल याचा अर्थ प्रकट करणे, आवाज करणे, एखाद्या पूर्ण भागातील काही अंश अविष्‍कारीत करणे इत्‍यादी. खुप गोगाट झाला की आपण म्‍हणतो काय कलकल चालली आहे.
    पूर्ण चंद्राच्‍या वाढत जाणाया अविष्‍काराला चंद्रकला म्‍हणतात जसा चंद्र कला कला ने वाढतो त्‍याच प्रमाणे एखादे चित्र प्रथम बिंदु, रेषा, आकार, रंग, पोत याचा हळूहळू वापर होवून यथा आवकाश पूर्ण होते. तसे शास्त्रीय संगीतातील एखादा रागामध्‍ये हळूहळू आलाप, तान, बंदिश इत्‍यादी. अविष्‍काराने रागाचे स्‍वरुप उलघडताना दिसते.
ही कला एक जादुगारीण आहे. तिचा स्‍पर्श वस्‍तुला, विचाराना अगर भावनाना झाला की त्‍यांना चिरंतन रुप प्राप्‍त होते. मनुष्‍यांच्‍या मनात आनेक भावना थैमान घालत असतात. या भावना उत्‍कट झाल्‍या म्‍हणजे त्‍यांना प्रत्‍यक्षरुप देणे भाग असते. मग या भावना प्रत्‍येकाच्‍या आवडीनुसार मुर्तस्‍वरुपात येतात. कोण चित्र, शिल्‍प, गायण, वादन, कथा, कवीता, नृत्‍य, अभिनय यातून मुर्तस्‍वरूपात आणतात.
हे मुर्त स्‍वरूप आणताना त्‍याला कौशल्‍य दिले की ती कला होते. कौशल्‍या कशासाठी, तर सुंदरता हा कलेचा आत्‍मा आहे. आणि सुंदरता आणण्‍यासाठी कौशल्‍या आवश्‍यक असते.    
कलेचा संबंध मानसाच्‍या आचार, विचार, भावना, व निसर्गातील घटकाशी असतो. म्‍हणून कलेबध्‍दलचे आनेक वेगवेगळे विचार आहेत.

सर्व प्रकारची कला म्‍हणजे आत्‍म्‍याचे प्रकटीकरण. 

कलेचे महत्‍व :

    प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे एक महत्‍वाचे अंग बनलेले आहे. जे जे सौंदर्य पूर्ण व कलात्‍माक तेथे मानव आकर्षीला जातो. मानवाची दृष्‍टी जेव्‍हा कलेने किंवा सौंदर्याने भरून जाते जेव्‍हा तो कलेचा भोक्‍ता होतो. 
मानव हा बुध्‍दीचे लेणे लाभलेला आणि म्‍हणून इतर प्राण्‍यापेक्षा वेगळा प्राणी आहे. या दृष्‍टीने त्‍याची इतरापेक्षा विकसित व उच्‍च दर्जाची जीवनप्रणाली आहे. व ही प्रणाली सुरू झाल्‍यापासून कला त्‍याच्‍या जीवनाचा एक वैशिष्‍ट्यपूर्ण भाग बनली आहे. आदिमानवाने सुध्‍द सृजनशील कला निर्माण करून जीवनाची वाटचाल केली. ही कलाप्रवृत्‍ती त्‍याला कधीही स्‍वस्‍त बसून देत नाही याचे पूरावे प्रागैतिहासिक काळात मिळतात.

    जसजसा मानवाचा संस्‍कृतिक विकास होत गेला तस तसा ही कला अधिकच त्‍याच्‍या जीवनात ठामपणे दृढमूल झाली. जगात उदयास आलेल्‍या आनेक संस्‍कृतिकडे पाहील्‍यास असे दिसून येईल की, कोणत्‍याही समाजामध्‍ये मग तो सुशिक्षितांचा व अशिक्षितांचा असो,  मागासलेला असो किंवा सुसंस्‍कृत वा पुढारलेला असो कला निर्मिती हे लोकजीवानाचे एक आवश्‍यक अंग बनले आहे. कलेचा विकास हा कोणत्‍याही शास्‍त्रीय प्रगतीवर अवलंबून नाही. प्राचीन काळात इजिप्‍त, मेसोपोटेमिया, भारत, चीन, ग्रीस इत्‍यादी देशातील मानव प्रगत स्‍वरूपाचा नसतानाही कलाक्षेत्रात मात्र आश्‍चर्यकारक कामगीरी झाल्‍याचे आढळून येते.

मानवाच्‍या तिन्‍ही अवस्‍थेत कलेचे स्‍थान :

बालावस्‍था – प्रथम कोणत्‍या गोष्‍टी बाल आकर्षले जाते ते हालचाल व रंग
प्रथम पेन्‍सील मिळाली की रेखाटन करते. रेगोट्या मारने. (गणित, इंग्रजी इत्‍यादी विषयाचा सराव करत नाही) चित्र ओळखते. येथेच त्‍याची कलाप्रवृती जागृत होते व आवड निर्माण होते. व त्‍याचा कल आपणास कळतो.
तारूण्‍यावस्‍था  इथे सौंदर्याकडे ओढ वाढतो, आपल्‍या भाव भावना वेगवेगळ्या माधमातून प्रकट करतो. ते करण्‍यासाठी त्‍याला कलेचा असरा घ्‍यावा लागतो. त्‍याला सुंदर लयबध्‍द गोष्‍टी आवडतात. सुंदर कपडे, मनमोहक ठिकाणे पहाणे, मन धुंदकरणारी गाणी, संगीत ऐकणे. स्‍वत: सुंदर दिसण्‍यासाठीचा प्रयत्‍न, वेगवेगळे आकार, त्‍याचे सौंदर्य, विचारसौंदर्य, भावसौंदर्य, हे आत्‍मसात करतो. त्‍यातून जीवनातील मेळ, प्रमाण बध्‍दता, तत्‍वज्ञान, सुप्‍त भाव-भावना व सुप्‍त निर्माण शक्‍ती यांना वाट करून देतात व जीवनात सफल होतात.
वृध्‍दावस्‍था  या काळात सर्वांचे दुर्लक्ष झालेले असते अशा वेळी त्‍याला सात देते ती कलाच असते. कोणी किर्तन, भजन, गणी ऐकणे, साहीत्‍य वाचने अशा गोष्‍टी करत जीवन संपवतो.

 याचा अर्थ कला तिन्‍ही अवस्‍थेत मानवास सात देते. 


शालेयस्‍तरावर चित्रकला आवश्‍यक :

          शालेयस्‍तरावरील कलाशिक्षण आणि विशेषत: चित्रकलेचे शिक्षण हे एक विशिष्‍ट प्रकारचे शास्‍त्र आहे. बालवयापासून मुलांनाच्‍या मनावर कलेचे संस्‍कार घडविणे म्‍हणजे ख-या अर्थाने चांगले सुसंस्‍कृत नागरिक बनविण्‍याचा विचार करणे हा या शास्त्राचा मूलभूत आधार आहे. सामान्‍य नागरिकांच्‍या मते मुलोच्‍य पुढील अयुष्‍यात ज्‍यांना डॉक्‍टर, इंजिनिअर, इत्‍यादी व्‍हायचे आहे त्‍यांना या विषयाचा फारसा उपयोग नाही. हा गैरसमज आहे. खरी वस्‍तुस्थिती अशी आहे की चित्रकला हा विषय नसुन ती एक शिस्‍त आहे. की ज्‍या मधून इतर विषय ही योग्‍य प्रकारे शिकता येतात. ज्‍या विद्यार्थ्‍यास सुंदर लयबध्‍द, गोष्‍टी पाहून आनंद होतो त्‍याची संवेदशक्ती सचेत होते. व चागल्‍या कलात्‍मक गोष्‍टी स्‍वत: बनविण्‍यास प्रवृत होतो. असा विद्यार्थी आपल्‍या आयुष्‍यास सुत्रबध्द आकार देतो. कोणत्‍याही क्षेत्रात तो कमी पडत नाही. त्‍याला जीवन कलारसिकतेने जगण्‍याची सवय लागते ज्‍यामुळे तो त्‍याच्‍या जीवनातील कठीण परिस्थितीतही त्‍याच्‍या मनाचा तोल जावून देत नाही.
    लहानपानापासून कलेचे संस्‍कार मनावर घडल्‍यास व्‍यक्तिमत्‍त्‍वाला एक गहिरेपणा प्राप्‍त होतो. म्‍हणून शालेय जीवनात चित्रकलेचाअर्तभाव असणे क्रमप्राप्‍तच ठरते. जगातील अनेक शिक्षणतंज्‍ज्ञांना त्‍याची प्रखरतेची जाणिव झाली आहे. वैफल्‍या, क्रौर्य, नयूनगंड, असहाय्यता, अनेक प्रकारच्‍या मानसिक विकृती या आजच्‍या समाजातील प्रकर्षाने जाणावणा-या प्रवृती नाहीशा करावयाच्‍या असतील तर जीवनाला क्रियाशीलतेचे वळण लावणे आवश्‍यक आहे. हे वळण लावण्‍यासाठी साधा सरळ मार्ग म्‍हणजे मुलांना सुंदर गो‍ष्‍टीत रमण्‍याची संधी देणे. अशी संधी कलेव्‍दारे सहज शक्‍य होते. या पार्श्‍वभूमिवर विचार करता, शाळेत चित्रकला शिक्षणाचे महत्‍व आहे. याची कल्‍पना येईल.
    लहान मुलांना रंगाबद्दल कुतुहल असतेच रंगाबरोबर आकारची जाण, आकलन वाढविणे या दृष्‍टीचा विकास करणे. आकाराचे ज्ञान देत असताना पोताची जाण त्‍या अनुषंगाने स्‍पर्शज्ञाना वाढविणे, स्‍पर्श, गंध, स्‍वाद, श्रवण, दर्शन या व्‍दारे सौंदर्याचा आस्‍वाद घेण्‍याची प्रवृती निर्माण करणे, विकसित करणे त्‍यासाठी योग्‍य संधी देणे.
    परमेश्‍वराने प्रत्‍येक व्‍यक्तिमध्‍ये कलेचा अंश ठेवलेला आहे. त्‍याचे स्‍वरूप वेगवेगळे असू शकते. परंतू तो अंश आपल्‍यात आहे. हे ओळखण्‍याचे व त्‍याच्‍या अविष्‍काराचा प्रयत्‍न करणे म्‍हणजे कलेची उपासणा करणे. कोणत्‍याही ऐहिक सुखापेक्षा कलेतून मिळणारा आनंद निश्चित उच्‍च प्रतीचा असतो.
    कला शिक्षणाचा मूळ हेतू मनाला वळण लावणे नसून संपूर्ण जीवनाला नीट वळण लावणे, लहान मुलाच्‍या मनात दडून बसलेल्‍या भाव भावना, सुप्‍त निर्माणक्षम शक्‍ती यांना वाव देवून त्‍यांच्‍या व्‍यक्त्मित्‍त्‍वाचा विकास करणे. हे शालेय कलाशिक्षणाचे प्रमुख उद्दिष्‍ट आहे. हे मानावेच लागेल.



    कला आणि क्रीडा हे विषय विद्यालयाचा गाभा आहे.

1 comment:

माझी गच्चीवरील शेती

  माझी गच्चीवरील शेती      आज प्रत्येक मानुस भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याच प्रमाणे शासनही लोकांनां या सुविधा द...