पोत (TEXTURE)

 

पोत (TEXTURE)

पोत व्‍याख्‍या – गुळगुळीत वा खरबरीत कोणत्‍याही पृष्‍टभागाला पोत म्‍हणतात. खादी, टेरलीन, लोकर, रेशम, मखमलचे कापड तसेच प्‍लॉस्‍टीक, काच, धातू, लाकुड, रबर या प्रत्‍येकाचा पोत भिन्‍न आहे. पोताची जाणीव दोन प्रकारे होते, म्‍हणून पोताचे दोन प्रकार होतात.

१.    स्‍पर्शजन्‍य (tactile texture)   2. द्दक् पोत (Visual texture)

1.   स्‍पर्शजन्‍य पोत (tactile texture)

        ज्‍या पृष्‍ठभागाला हाताने स्‍पर्श केला असता मऊ, नितळ, खरबरीत अशी संवेदना होते त्‍याला स्‍पर्शजन्‍य पोत असे म्‍हणतात. लोकरीच्‍या किंवा फरच्‍या कपड्याचा लुसलुशीत मऊपणाची जाणीव नुसत त्‍याकडे पाहून होत नाही तर त्‍यांनास्‍पर्श केल्‍यास मऊ संवेदना होते. उलट घोंगडी किंवा जेनावरून हात फिरवल्‍यास केसाचा राठपणा जाणवेल.


2. द्दक पोत (Visual Texture)

    ज्‍या पृष्ठभागाकडे द्दष्टिक्षेप टाकला असता त्‍याच्‍या पृष्‍ठभागाच्‍या नितळ वा खरबरीतपणाची जाणीव स्‍पर्शाविना डोळ्याला होते, त्‍याला द्दक पोत म्‍हणतात. काच, माती, लाकुड, विटा, संगमरवरी दगड, आंबा, फणस, कार्ले, दोडका, इत्‍यादी यांच्‍या कडे फक्‍त पाहिले तरी त्‍यांच्‍या गुळगुळीत व खरबरीतपणाची डोळ्याला जाणीव होते.
      कलेत द्दक पोतालाच विशेष महत्‍त्‍व असते. चित्रात पेन्सिल, शाई व टाक, रंग इत्‍यादी माध्‍यमांच्‍या साह्याने वेगवेगळे पोत निर्माण केले जातात. आधुनिक चित्रातून लाकूड, रंगीत कपडे, कागद, वाळू इत्‍यादी साहित्‍य चिटकवून अथवा कचित  प्रसंगी पृष्‍ठपण जाळूनही पोताची जाणीव जास्‍त समृध्‍द केली जाते. शिल्‍पात माती, काष्‍ठ, प्‍लॅस्‍टर, खडबडीत पाषाण इत्‍यादी माध्‍यमांव्‍दारे विविध पोताचे दर्शन घडवता येते. वास्‍तुकलेत दगड, विटा,संगमरवरी फरशा, लाकूड वाळू सिमेंट इत्‍यादी भिन्‍न भिन्‍न साहित्‍याचा वापर करुन भिन्‍न भिन्‍न पोत निर्माण केले जातात व वास्तूचे रुप आकर्षक व देखणे बनवले जाते. अशा त-हेने चित्रशिल्‍प वास्‍तुकलेत भिन्‍न भिन्‍न पोताची जाणीव वेगवेगळे साहित्‍य वापरुन निर्माण केली जाते.

No comments

माझी गच्चीवरील शेती

  माझी गच्चीवरील शेती      आज प्रत्येक मानुस भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याच प्रमाणे शासनही लोकांनां या सुविधा द...