हार्मोनियम


हार्मोनियम 

हार्मोनियम चा शोध तरी शहरातील अलेक्झांडर डिबेन यांनी इ. स. 1770 मध्ये लावला. भारतात हे वाद्य इ.स. अठराशे नंतर युरोपियन लोकांनी आणले. हाताने किंवा पायाने भात्या द्वारे हवा भरून   शिट्ट्याच्या मार्फत सुरेल ध्वनी निर्माण होतो.
लोकप्रिय संगीतातील हार्मोनियम हे  एक उत्कृष्ट व महत्त्वपूर्ण
वाद्य. हवेच्या साह्याने वाजवता येत असल्याने महत्त्वाचे. भारतीय
वर्गीकरण पद्धती प्रमाणे हे वाद्य सुषिर वाद्य गटात मोडले जाते. शिसव
किंवा  देवदार लाकडाच्या चौकोनी आकाराच्या पातळ फळ्यांचे आतून
पोकळ असे खोके तयार केलेले असते. वर विविध स्वरांच्या पट्ट्या
बसवलेल्या असतात. पेटीत हवा भरण्यासाठी भाता असतो. 
स्वर ओळखण्यासाठी या वाद्याचा उपयोग होतो.
  का. १ =  काळी 1           पां. १ =  पांढरी

 अ.  हातभाता ब.  स्वर पट्टीवरील  ताण

 क.  काळी पट्टी ड. पांढरी पट्टी

 ई.   कॅबिनेट अथवा  पेटी ई.  स्टॉपर 

  हार्मोनियम मध्ये काही आखूड व काही  लांब पट्ट्या दिसून येतात. आखूड पट्ट्यांना काळा रंग असतो,  लांब पट्ट्यांना पांढरा रंग असतो. काळ्या पट्ट्यांची विभागणी दोन आणि तीन अशा गटात केलेली आढळते.  पांढऱ्या पट्ट्या सलग असतात. काळ्या पट्ट्यानां काळी एक, काळी दोन, काळी तीन, काळी चार, काळी पाच अशा नावांनी ओळखतात. काळी पाच नंतर येणारी काळी पट्टी ही  काळी एकच असते. 
पांढऱ्या पट्ट्यांना पांढरी एक,  पांढरी दोन ते पांढरी सात असे म्हटले जाते.   काळी एकच्या डाव्या बाजूस असणारी पांढरी पट्टी ही पांढरी एक होय.  याच पट्टीला पश्चिमात्य संगीतात जी असे म्हणतात. सात पांढऱ्या पट्ट्या पाच काळ्या  पट्ट्यामध्ये ही स्वरमंजुषा संगीताचे भांडार साठवून आहे. 
हार्मोनियम ची वैशिष्ट्ये

 १) कोणत्याही पट्टीवर बोट ठेवले की स्वराचा आवाज येतो. 
२) वाद्यांच्या तारा स्वरात लावण्या इतके  स्वरज्ञान असावे. 
३)  स्वरज्ञान असेल किंवा नसेल ‘सा’ ची पट्टी दाबली की ‘सा’ वाजणार. 
४)   पट्ट्यांचा एकाच प्रकारचा आहे. 
५)  काही अखुड व काही लांब पट्ट्या ही असतात. 
६)  अखुड पट्ट्यांचा रंग काळा असतो व लांब पट्ट्यांचा यांचा रंग पांढरा असतो. 
७)  दोन व तीन गटात टाळ्या पट्ट्यांची विभागणी आढळते. 
८)  पांढऱ्या पट्ट्या असतात. 
९)  काळी एक च्या बाजूस असणारी पांढरी पट्टी ही पांढरी एकच असते.

हार्मोनियमचे महत्व

१) तयारी असली तर मनातले स्वर काढून लागते.
२) पेटी वाजविताना हाताच्या बोटांच्या क्रमाला महत्व आहे.
३) कोणत्या पट्टीवर कोणते बोट ठेवले म्हणजे वाजविणे सोपे जाते याचा अंदाज घ्यावा. 
४) सराव सातत्यपूर्ण केला  तर पेटीवर बोटे सहजपणे फिरू लागतात.  ५) तयारी चांगली झाली की मग पेटीकडे न पाहता वाजवता येते.
६) हार्मोनियम वादनात मात्र शिस्त महत्वाची आहे.
७) अंगठा फक्त पांढऱ्या पट्ट्यासाठी असा स्थूल नियम आहे.
८) कोणतीही पट्टी ‘सा' मानून बोटे ठेवण्याची पद्धत अभ्यासणे गरजेचे आहे.
९) आरोह व अवरोह बोटांच्या क्रमाव्दारे योग्य पद्धतीने वाजवावी. 
१०) पां १ पट्टीला सां नि ध प म ग रे सा असे वाजविताना १, ३, २, १, ४, ३, २, १ असा बोटांचा क्रम राहू द्यावा. 
स्वरांची माहिती
 संगीतात सात स्वर आहेत
संपूर्ण नाव संक्षिप्त प्रचलित नाव
  षडज (अचल) सा (अचल) 
  ऋषभ रे
गांधार
मध्यम
पंचम प (अचल) 
धैवत ध 
निषाद नि 
या सात स्वरामध्ये सा व प हे अचल आहेत. त्या स्वराचे कोमल अथवा तीव्र असे प्रकार होत नाही. कोमल ‘सा' किंवा तीव्र ‘प' कधीही नसतो. पण रे, ग, ध, नि यांचे स्वर कोमल असतात. शुध्द मध्यम आणि तीव्र मध्यम असे माध्यमाचे भेद आहेत. शुद्ध, कोमल आणि तीव्र मिळून १२ स्वर मिळतात.
१. सा अचल
२. रे कोमल
३. रे शुद्ध 
४. ग कोमल 
५. ग शुद्ध 
६. म शुद्ध कोमल ‘म' नसतो एकमेव तीव्र स्वर 
७. मं तीव्र 
८. प अचल 
९. ध कोमल 
१०. ध शुद्ध 
११. नि कोमल 
१२. नि शुद्ध 
हार्मोनियम वर सुरांच्या अनेक कळा बटणे असतात. हार्मोनियमच्या काळी चार शी समस्वरात असलेल्या तबला काळी 4 चा तबला म्हणून ओळखला जातो. शुद्ध स्वर लिहिताना कोणतेही चिन्ह नसते. कोमल स्वराच्या खाली एक आडवी रेषा असते. जसे कोमल ग म्हणजे ग. तीव्र माध्यमासाठी म वर एक उभी रेषा काढतात जसे| | ‘म'   
स्वर सप्तकातील मूळ सात स्वरांना ना शुद्ध स्वर म्हणतात. मूळ नावे १. षड्ज २. ऋषभ ३. गंधार
४. मध्यम ५. पंचम ६.  दैवत
७. निषाद 
हे संक्षिप्त नावाने संगीतात प्रचारात आहे
१. सा २. रे ३. ग  ४. म ५. म ६. ध ७.नि  



No comments

माझी गच्चीवरील शेती

  माझी गच्चीवरील शेती      आज प्रत्येक मानुस भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याच प्रमाणे शासनही लोकांनां या सुविधा द...