उपघाटक

 संकल्‍प

संकल्‍प म्‍हणजे निश्चित उद्देशाने एखाद्या पदार्थाची, वस्‍तूची अथवा गोष्‍टीची सहेतुक निर्मिती. उदा. फुलदाणी, पिशवी, पंखा, साड्या, टेबल क्‍लाथ, प्‍लेट, इत्‍यादी. हे सर्व संकल्‍पाचे आकार आहेत. त्‍यांचा उद्देश सुशोभित करण्‍यासाठी व वापरासाठी आहे. या वस्‍तू सुशोभित व देखण्‍या करण्‍यासाठी कलावंत यांचा पृष्‍ठभाग अलंकृत करतो. जेव्‍हा फक्‍त सौंदर्य करणे हाच हेतू असतो तेव्‍हा त्‍याला संकल्‍प म्‍हणतात. या वस्‍तूंचा वापर करणे एवढाचा हेतू नसतो तर रेषा, आकार, छायाभेद, रंग व पोत यांच्‍या वापरातून योग्‍य प्रमाणांच्‍या संबंधातून कलात्‍मक सौंदर्य निर्माण करणे हा संकल्‍पाचा हेतू असतो.



संकल्‍पाचा विचार केल्‍यास त्‍याचे दोन भाग पडतात.



१. घटनात्‍मक संकल्‍पत (बाह्याकार)

२. अलंकरणात्‍मक संकल्‍प

१. घटनात्‍मक संकल्‍प (बाह्याकार) – 
        मूळ साहित्‍याच्‍या मर्यादा, निर्मिती अथवा घढणीची स्थित्‍यंतरे लक्षात घेऊन रेषा, आकार, रंग व पोत यांच्‍या साह्याने उपयुक्‍तता याचा विचार करून घडवलेल्‍या वस्‍तूचा बाह्य आकार याला घटनात्‍मक संकल्‍प म्‍हणतात. मग वस्‍तूचे रुप हे त्रि‍मित असेल अथवा व्दिमित असेल. थोडक्‍यात घटनात्‍मक संकल्‍प म्‍हणजे वस्‍तूचा बाह्या आकार होय.
        चांगल्‍या घटणात्‍मक संकल्‍पाची काही वैशिष्‍ट्ये आहेत. ती वस्‍तू साधी व प्रमाणबध्‍द असावी. ती वेधक व सुंदर हवी, पण ती बनवण्‍याचा उद्देश ही साध्‍या झाला पाहिजे. तसेच ज्‍या साहित्‍या पासून ती बन‍वली आहे. व ती घडवत असताना ज्‍या अवस्‍थेतून ती जाते, तिचा योग्‍य विचार केलातर तो यशस्‍वी घटनात्‍मक संकल्‍प होईल. उदा. चिनीमातीची चहाची किटली तयार करताना तोंडाशी रुंद, पायाशी आगदी बारीक, त्‍याची तोटी खुप वरती व मोठी, व किटली उचण्‍याची मुठ नाजुक केली तर काय होईल. असे पात्र कितीही सुंदर असलेतरी त्‍याचा वापण्‍यास काही उपयोग होणार नाही. मुठ नाजूक असल्‍यामुळे चहाने भरलेली किटली उचलताना मुठ तुटण्‍याचा संभव आहे. तसेच पायशी बारीक असल्‍या मुळे ते कलंडण्‍याची शक्‍याता आहे. त्‍यामुळे अशा प्रकारच्‍या पात्राचा घटनात्‍मक संकल्‍प चांगला नाही. त्‍यासाठी अशी किटली तयार करताना ती कलंडणार नाही म्‍हणून पाया मोठा, किटली उचललीतर मुठ तुटणार नाही, व ती जास्‍त नक्षीदार नसावी, कारण वापरण्‍याच्‍या व स्‍वच्‍छतेच्‍या दृष्‍टीने त्‍याचा उपयोग नाही. चहा ओतण्‍यासाठीची तोटी खालच्‍या पायापासून सुरू होणारी व ते पात्र चिनी मातीचे बनवले जात व त्‍याच्‍या मर्यादा याचाही विचार करणे आवश्‍यक आहे. हे पात्र प्रामाण बध्‍द तर हवेच, तसेच घडवण्‍याचा उद्देश साध्‍य झाला पाहिजे. या सर्व गोष्टीचा विचार केला तरच घटनात्‍मक संकल्‍प चांगला होतो.

घटनात्मक संकाल्पाचे दोन प्रकार केले जातात.

१ . भौमितीक आकारामधील संकल्प.



वरती आपण काही भौमितिक आकारातील घटनात्मक संकल्पची उदाहरणे पाहिली. या संकल्पनामध्ये अलंकरणात्मक संकल्प तयार करताना आपण दोन प्रकारे आकाराचे विभाजन करू शकतो. एक आकाराचे समप्रमाणात योजना व अवकाश अवकाशाचे विभाजन. याला आपण समांगी संकल्प म्हणतो व दुसरे विषमप्रमाणात पण तोलयुक्त अवकाशाचे विभाजन म्हणजे यालाच विषमांगी संकल्प म्हणतात.

प्रथम आपण विषमांगी संकल्पाचा विचार करू. विषमांगी संकल्पा मध्ये अधिक कल्पकता, विचार व योग्य योजनेची आवश्यकता असते. नुसत्या भौमितिक आकाराचा वापर दिलेल्या जागेत न करता परिचित वस्तू, नैसर्गिक नमुन्यांचे आकार, पशुपक्षी, मानव कृती, फक्त रेषा, केवल आकार या विविध आकारांची योजना केल्यास संकल्पातील तोच तोच पणा व साचेबंदपणा नाहीसा होऊन संकल्प अधिक वेधक होईल. अशा प्रकारच्या आकृतिबंधाच्या रचनेत प्रमाण, तोल, प्राधान्य, लय इत्यादी अंगांचा उपयोग करण्यात विद्यार्थ्यांच्या कौशल्याची खरी कसोटी लागते व त्यामुळे कौशल्य आत्मसात करण्यास अधिक वाव राहतो व अधिक स्वातंत्र्य लाभते.

तसेच अशा प्रकारच्या संकल्पामध्ये रंग काम करताना विविध व योग्य रंगसंगतीचा वापर तसेच योग्य ठिकाणी पोतीनिर्मिती करणे अशा कौशल्याची ही कसोटी लागते. यातून एक नावीन्यपूर्ण अमूर्त आकाराच्या निर्मितीचा आनंद घेता येतो. हे संकल्प चित्र म्हणजे रचनाचित्र व स्मरणचित्र या याचा मूलभूत पायाच आहे. रचना चित्रांमध्ये रेषा, आकार, रंग यांनी युक्त अशी आकर्षक मांडणी केली जाते. ती कोणत्याही उद्देशा शिवाय करता येते.

संकल्प बनवताना घ्यावयाच्या  काही दक्षता.

  रेखाटन करतात घ्यावयाची दक्षता

  1. अवकाशाचे तोलयुक्त विभाजन करणे. म्हणजे मुख्य घटक व मोकळी जागा यांचे विषम प्रमाण असावे. 

  2. आकाराचे अलंकरण न करता तो सोपा व सुटसुटीत आकार रेखाटावा.

  3. आकारांचे वास्तववादी रेखाटन न करता, प्रतीक रूपात रेखाटन असावे.

  4. घटक एकाच प्रकारचे व एकाच आकाराचे असू नयेत, मोजक्या तीन किंवा चार घटकांची योजना करावी. म्हणजे फार विविध वेगवेगळ्या विसंगत घटकांची योजना, जरी त्यात विविधता असली तरी करू नये. 

  5. आकाराचे  अंशता अच्छादन करावे. त्यामुळे घटकांची गुंफण होऊन संकल्प चित्रात एकसंधपणा व सलगता सहज येते. तसेच आकारांची पुनरावृत्ती करावी. हे आच्छादन दोन प्रकारे करता येते. एका आकारात दुसरा आकार कडी सारखा अडकवलेला दाखवून गुंफण साधता येते. व दुसरे  एकाखाली दुसरा आकार थोडासा झाकलेला दाखवून अच्छादन करता येते. 

  6. घटकांचा सर्व क्षेत्रफळात व्यवस्थित विस्तार झाला पाहिजे. एकाच बाजूला गर्दी झाली दुसरीकडे खूप जागा रिकामी राहिली असे होऊन तोल ढळला आहे असे वाटू नये .  



२. दैनंदिन वापरातील वस्तूवरील संकल्प.  


२. अलंकरणात्‍मक संकल्‍प – घटनात्‍मक संकल्‍प तयार झाल्‍यावर त्‍याचा पृष्‍ठभाग अधिक सुंदर व कलात्‍मक होण्‍यासाठी, त्‍या वस्‍तूचे सौंदर्य वाढवण्‍यासाठी रेषा, आकार, रंग व पोत यांचा वापर करुन केलेले आलंकरण याला अलंकरणात्‍मक संकल्‍प म्‍हणतात.

No comments

माझी गच्चीवरील शेती

  माझी गच्चीवरील शेती      आज प्रत्येक मानुस भौतिक सुविधा चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी धडपडत आहे. त्याच प्रमाणे शासनही लोकांनां या सुविधा द...