पक्षी श्रेष्ठ की माणुस
पक्षी श्रेष्ठ की माणुस
निसर्ग म्हणजे
आपल्या आवती भवतीचा परिसर, यामध्ये अनेक जीव राहतात. त्यामध्ये पक्षी, प्राणी, मानव प्राणी, यामध्ये
मानव प्राणी व पक्षी-प्राणी असे
दोन गट करू, पक्षी व
प्राणी यांच्या गरजा कमी असतात. त्या मुळे ते निसर्गाची हानी न करता आपले जीवन
जगतात व समाधानी असतात. पण मानवाच्या गरजा नेहमी वाढत असतात. एका गरजेतून अनेक गरज
निर्माण होत असतात. त्यामुळे त्याच्या
गरजा वाढतच जातात. त्याला कितीही मिळाले तरी तो कधीच समाधानी नसतो. अशाच गरजेतुन
त्याने निसर्गावर अतिक्रमण करून निसर्गाचा -हस करत आपल्या अनेक गरजा पूर्ण केल्या. मानवाने राहण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी, रस्त्यासाठी अशा
अनेक कारणांसाठी जंगल तोड केली. अशाचा एका जंगल तोडीतून आमचेही गाव वसले असेल त्यातील
एका कॉलनीत माझे छोटेसे घर आहे.
असे जरी असले तरी
मानवास निसर्गाची ओढ राहाते. तो आपल्या घराभवती गच्चीवर, बाल्कनीत जेथे शक्य
असेल तेथे झाडे लावून निसर्गाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करतो आहे. यातूनच मी
माझ्या घरावरील गच्चीवर एक छोटीशी बाग फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये
मी जास्त करून फळभाज्या लावण्याचा प्रयत्न केला आहे. माझा असा प्रयत्न आहे की
आमच्या घरी लागणारा सर्व भाजीपाला आम्हास आमच्या गच्चीवरील बागेतून मिळावा. यासाठी कमी जागेत जास्त रोपे लावण्यासाठी व्हर्टिकल
गार्डनची कल्पना मला चांगली वाटली. यातूनच मी बाटल्यांचा वापर करुन व्हर्टिकल
गार्डन तयारी केली.
एक दिवस अशाच
एका बाटलीमध्ये दोन छोट्या पाहूण्यांंचे अतिक्रम झाल्यासारखे वाटले. खरे म्हणजे
ते अतिक्रम होती की त्यांचा हक्क होता हा विषय खुप विचार करण्यासारखा आहे. येथे
या विषयाकडे मी जात नाही. तर या बाटलीमध्ये दोन छोट्या बुलबुल या पक्षाने घरटे
करणे सुरू केले. सुरवातीस वाटले ते काढुन टाकावे. पण मन तयार झाले नाही. मी त्याकडे
दूर्लक्ष केले. मी या बाटल्यामध्ये पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करतो.
असे एकदा पाणी देण्यासाठी मी ठिबक चालू केले. व माझे लक्ष त्या बाटली कडे गेले
तर तो पक्षी त्या घरट्यात बसला होता व पाणी त्याच्या अंगावर पडत होते तरी तो त्याची
जागा सोडत नव्हता. मी त्याच्या खुप जवळ गेलो तरी त्याने जागा सोडली नाही. मग
माझ्या लक्षात आले की त्याने अंडी घातली आहेत व त्यांच्या सुरक्षेतेसाठी तो
पाण्यात भिजत असुन ही जागा सोडत नव्हता, म्हणून ती बाटली मी त्या ड्रिपरपासून बाजूला घेतली व
पाणी त्यामध्ये पडणे बंद झाले.
काही दिवसानी माझ्या
लक्षात आले, त्या
घरट्यामध्ये दोन चोची आकाशाकडे तोंड करून ओरडत आहेत, पण आवाज येते नव्हता. पण कोणास
तरी हाक मारत आहेत असे वाटत होते. इवल्या इवल्याशा त्या चोचीकडे पाहीले तर त्या
दोन असावेत असे वाटले पण बारकाइने पाहिल्या नंतर त्या तीन पिल्लांच्या होत्या.
इवल्याशा छोट्या बाटलीत त्या दोघांचा त्याच्या पिल्लास खुप छान संसार चालला
होता. खुप समाधानी जोडपे वाटत होते.
दोघापैकी एक त्या
पिल्लासाठी खाऊ आणावयास गेला की दुसरा त्यांचे संरक्षण करण्यासाठी तेथेच अवतीभवती
फिरत असे. असा त्यांचा सुखी संसार पाहून खुप बरे वाटत असे. पिलास खाऊ अणले की ते त्यांना
चारताना त्यांच्या चोचेची होणारी हालचा पाहुन खुप गंमत वाटत असे. हळुहळु पिल्ले
मोठी होत होती. मी वरती माझ्या बागेत काम करवायास गेलो की, जर त्यांना माझ्या तेथे येण्यानेे असुरक्षित
वाटले की मला भिती दाखवण्यासाठी अगदी जवळून भरकन जात असे, जनू काही मला ते चोच
मारतील अशा प्रकारे माझ्या कानापासून किंवा डोक्यापासून जात असे. पहिल्या वेळी मला
कळालेच नाही काय होते ते, पण नंतर लक्षात
आले ते आपल्या पिल्लांचे रक्षणासाठी माझ्यावर अक्रमण करत होते. मग आमचा हा खेळ रोजच सुरु झाला. मला थोडे
सावध राहावे लागत असे, कारण केव्हाही
व कोठुन त्यांच्या पैकी एकादा माझ्यावर आक्रमण करायचा. या सर्व प्रकाराची मला खुप
गंमत वाटत असे.
असे बरेच दिवस गेले
नेमका किती कालावधी गेला आठवत नाही. आणि एका सकाळी मी बागेत गेलो तर ते घरटे मोकळे
दिसले. मला वाटले कोणीतरी त्या घरट्यावर अक्रमण केले आणि पिल्लस काही दगा फटका केला
असे वाटले मन एकदम बेचैन झाले. मी इकडेतिकडे पाहीले तर मला खाली एक पिल्लु मेलेले
दिसले. व ते दोन पक्षी आमच्या शेजारी असलेल्या नारळाच्या झाडावर बसून चिवचिवाट करीत
होते. मला खुप दु:ख झाले. अनेक
विचार मनात येऊन गेले की या पक्षांचे जीवन किती प्रयासान ते पिल्लांचा साभाळ करत होते.
आणि कोण एका क्षण आला व त्यांचे सर्व हिरावून घेऊन गेला. असा विचार करता मी इकडे तिकडे
बागेत नजर फिरवत होतो. तो एक छोटे पिल्लु एक कुंडीच्या बाजूला दिसले, ते टकमक इकडेतिकडे
पहात होते. मग मी दुस-या पिल्लाच्या
शोधात नजर फिरवली दुसरे पिल्लु दिसले मला खुप आनंद झाला. ती दोन्ही इकडे तिकडे बघत
उडण्याचा प्रयत्न करीत होती. एवढ्यात ते दोन्ही पक्षी त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी
घास भरवला.
ते दोघे घास भरवायचे
व पुन्हा उडुन जायचे, पुन्हा काहीतरी
घेवून यायचे असा त्यांचा क्रम चालू होता. या काळात त्या पिल्लांचे छोट्या कुंडीवरून
इकडून तिकडे उडण्याचा सराव चालायचा, मी बराच वेळ ते पहात होतो. व त्यांचा हा खेळ मी
कॅमे-यामध्ये कैद
केला. मला या क्षणाचा इतका आंनद झाला की मी तो शब्दात सांगु शकत नाही.
मला वाटले आता मला बरेच
दिवस हा खेळ पहावयास मिळले. पण तसे काही झाले
नाही. दुस-या दिवशी मला त्यांच्यातील
कोणीच पहावयास मिळाले नाही. गेले? ते त्यांचे घरटे सोडून गेले. मी त्यानंतर दोन तिन दिवस सारखे
पहात होतो पण माझी निराशा झाली. कोणी परत आले नाही. ते दोन्ही पक्षी त्या दोन पिल्ला
बरोबर आपआपल्या मार्गाने निघुन गेले. आपले खुप प्रयत्नाने बांधलेले घरटे सोडून, त्या घरट्याचे काय
होईल, त्या घरट्यात दुसरे कोण राहील का? आपण केलेल्या
कष्टाचा दुसरा कोणी वापर करेल का? मग आपल्याला त्याचा काय फायदा, अशा फायद्याच्ाा तोट्याचा विचार न करता ते
सर्व सोडून गेले. आता ती पिल्लही चांगले उडायला शिकली असतील व ती ही आता वेगवेगळ्या
वाटे ने गेली असतील. कसे आहे ना या पक्षांचे
जीवन बागेत आली, घरटेे बांधले, अंडी घातली, त्याचे संरक्षण केले, त्यातून पिल्ले जन्मास
आली. त्यांना खाऊ
घातले, मोठे केले, उडण्यास शिकवले, या जगात कसे जगायचे
याचे धडे दिले आणि सर्व सोडून आपआपल्या वाटेणे निघून गेले. त्यांचा कोणताही स्वार्थ
नाही. फक्त जगण्याचा निखळ आनंद घेतात हे पक्षी किती छान जगतात ना,,,,,
खरे जमेला का असे मानव
प्राण्यास, मानव हा सर्वात
बुध्दीवादी प्राणी मानला जातो. मग तो घेतो
का असा जगण्याचा निखळ आनंद, जमेल का कधीतरी त्याला असे वागणे, असे अनेक विचार मनात
येत गेले व माझे मन खिंन्न झाले. खरेच याची उत्तरे कोण देऊ शकेल का? आहे का याचे कोणाकडे
उत्तर?
Post a Comment