उपघटक
स्मरणचित्र
वस्तू, प्रसंग, पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित
विशिष्ट उद्दिष्टे
१. मनातील व्यक्त कल्पना, भावना, व्यक्त करण्याची संधी देणे.
२. निरीक्षणशक्ती, स्मरणशक्तीचा विकास करण्यास मदत करणे.
३. स्वतंत्र विचार व स्वनिर्मितीतून आनंद मिळवण्यास मदत करणे.
४. पाठ्यपुस्तकातील घटकावर आधारित शैक्षणिक साधन निर्माण करण्यास प्रवृत्त करणे.
पूर्वी पाहिलेल्या घटना, प्रसंग, वस्तू यांचे स्मरण करून त्यांचे गतिमान रेखाटन करणे
म्हणजे स्मरण चित्र होय. यामध्ये मुख्य आकृतीला अथवा प्रसंगाला महत्त्व असून
व्यक्तीचित्राच्या गतिमान रेखाटनाला, त्याच्या प्रमाणाला महत्त्व असते. नैसर्गिक रेखाटने
भडक रंगाचा वापर व प्रतीकांचा वापर नसतो. स्मरण चित्रातील प्रसंग, दृश्य वस्तू पाहिलेल्या
असतात. प्रत्येकाची चित्रकृती ही ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे साकार होत असते. आणि
म्हणूनच तुमच्या नैसर्गिक कृतीमधूनच चित्र साकार झाले पाहिजे. कोणत्याही चित्राची नक्कल
करण्याऐवजी त्या चित्रात जे चांगले आहे त्याचा स्वीकार करून आपल्या चित्रातील उद्देश
कायम ठेवावा. स्मरणचित्र मध्ये पूर्वी पाहिलेल्या सभोवतालच्या वस्तू, घरे, झाडे, प्राणी,
पक्षी, दैनंदिन वापरातील घरातील, शाळेतील वस्तू इत्यादींचे आकार व रंग यांचे निरीक्षण
करून सूक्ष्म रेखाटन करावे. याचा सराव करावा.

स्मरण चित्र रेखाटताना घ्यावयाची काळजी
स्मरणचित्र पाहतो त्यातील सर्व भागावर एकाच वेळी लक्ष देता येत नाही. आपण एका
आकारावर दुसऱ्या आकारावर नजर फिरवत जातो. दृश्याचा मार्ग जाणीवपूर्वक चित्रकाराने
तयार केला पाहिजे, यामुळे चित्र पाहणार्याची नजर चित्रातील विविध घटकावरून फिरून
पुन्हा मुख्य घटकावर येते अशा तऱ्हेने चित्रात सुसंगती निर्माण व्हावी या दृष्टीने चित्रकार
पुढील काही गोष्टी कराव्यात.

प्रसंग चित्र
१. चित्रातील महत्त्वाचा घटक कागदाच्या मध्याच्या आसपास (बरोबर मध्यावर न काढता)
काढल्याने चित्रात याला महत्त्व प्राप्त होते.
२. इतर आकारापेक्षा मुख्य आकारास आकर्षक रंग दिल्याने त्याचे महत्त्व वाढते.
भाग रिकामा वाटू नये पार्श्वभूमी व घटकाचे प्रमाण सम नसावे ते विषय असावे.
५. वर नमूद केल्याप्रमाणे चित्रातील दृष्टीचा मार्ग निर्माण होण्यासाठी चित्रातील घटक
एकमेकांना सांधणे सोयीचे असते. हे घटक एकमेकावर आच्छादित करून त्यांच्यात
एकसंधीपणा निर्माण करता येतो घटकाचा अशा तऱ्हेने समूह निर्माण झाल्याने चित्र
बांधेसूद दिसतेच पण त्यामध्ये खोलीचा ही भास निर्माण होतो.
६. चित्रातील घटक व पार्श्वभूमी अलग दिसणे सोयीचे असते. पार्श्वभूमी ने चित्र घटकाला
उठाव आणला पाहिजे यादृष्टीने पार्श्वभूमीची योजना असावी. उदाहरणार्थ जर घटक
गडदेछटे मध्ये असतील तर पार्श्वभूमी फिकट असावी, मुख्य घटक फिक्कट असेल तर
पार्श्वभूमी गडद असावी. घटना, प्रसंग व विषय यानुसार ही आपण हे ठरवू शकतो.
७. चित्रात रंगसंगतीचा विचार व्हावा. निवडक मोजकेच रंग चित्रात घेतले तर चित्रात
एकसूत्रीपणा येतो. रंगकाम वास्तववादी करण्याचा प्रयत्न करावा.
१. चित्रातील महत्त्वाचा घटक कागदाच्या मध्याच्या आसपास (बरोबर मध्यावर न काढता)
काढल्याने चित्रात याला महत्त्व प्राप्त होते.
२. इतर आकारापेक्षा मुख्य आकारास आकर्षक रंग दिल्याने त्याचे महत्त्व वाढते.
३. कुस्तीचे मैदान, क्रिकेटचा खेळ अशा प्रकारच्या मैदानात जसे सर्व प्रेक्षकांचे लक्ष त्या
खेळाडूकडेच गेले पाहिजे त्याच प्रकारची रचना केलेली असते. त्याप्रमाणे चित्रातील इतर
गौण आकारांच्या मांडणीतून निर्माण होणारे मार्ग मुख्य आकाराकडे ओढले जातील अशी
रचना करावी.
४. चित्रातील पार्श्वभूमी व घटक यांचे विभाजन योग्य असावे याचा अर्थ चित्रातील कोणताही भाग रिकामा वाटू नये पार्श्वभूमी व घटकाचे प्रमाण सम नसावे ते विषय असावे.

Post a Comment